top of page
  • Writer's pictureyashasree barve

सागरकिनारी वाटे ...

My poem inspired by this view at the beautiful sunset at Anjarle beach. Anjarle is a serene blessed village in Dapoli, Ratnagiri district in Maharashtra, India.


नितांत सुंदर अशा आंजर्ले येथील समुद्र किनारी एका रम्य संध्याकाळी स्फुरलेली ही कविता


मावळता सूर्य

सोनेरी सागर

आकाशातून झरते

सोन्याची घागर

उसळत्या लाटांना

फेसाळती झालर

वाळूवर पसरते

मायेची चादर


लाटांवर नाचती

धवलशुभ्र तुषार

सोनेरी किरणांवर

होऊन स्वार


अथांग समुद्र

अमाप पाणी

अनादि अनंत

याची कहाणी

वाळूवर पुसटशा

पावलांच्या खुणा

विचारती कधी

परतशील पुन्हा


विपुल वैभव

डोळ्यात न मावे

सागरकिनारी वाटे

पुन्हा पुन्हा जावे

13 views0 comments

Comments


Post: Blog2_Post
bottom of page